
आदित्य ठाकरेंच्या बर्थडेला डोंबिवलीकरांची चांदी; १ रुपयात एक लिटर पेट्रोल!
राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून एक रुपया मध्ये एक लिटर पेट्रोल देण्यात आले आहे. देशातील पेट्रोलच्या किंमतीने शंभरी कधीच पार केली आहे. इतक्या स्वस्त पेट्रोल मिळत असल्याने पेट्रोल पंपाच्या बाहेर दुचाकीच्या रांगा लागल्या आहेत. कित्येक लोकांची एक रुपया मध्ये एक लिटर पेट्रोल मिळवून चांदी झाली आहे.
केंद्रातील भाजप सरकार पेट्रोलच्या दरवाढीस जबाबदार आहे. महागाईच्या मुद्द्यावर ती शिवसेना वेळोवेळी आक्रमक सुद्धा झाली आहे आज आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पेट्रोलची किंमत एक रुपया करत अनोख्या शुभेच्छा आदित्य ठाकरे यांना दिले आहेत तसेच केंद्र सरकार वरती अप्रत्यक्ष पणे महागाई वरती टीका करण्यात आले आहे.
हा उपक्रम युवा सेनेचे पदाधिकारी योगेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे शहर प्रमुख राजेश मोरे राजेश कदम उपस्थित होते.