अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदाराच्या कानशिलात भडकावली; व्हिडिओ व्हायरल!

0

सध्या सोशल मीडिया वरती अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हा प्रकार मध्यप्रदेशमध्ये घडला असून मध्य प्रदेशातील शहापूरमधील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी एका दुकानदाराच्या कानशिलात लावल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. जिल्हाधिकारी यांचे नाव मंजुषा विक्रांत राय असे आहे. त्या व्यक्तीसोबत जिल्हाधिकारी यांचा संवाद झाल्याचे व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे.

या व्हिडिओमध्ये मग्रूर भाषेत जिल्हाधिकाऱ्याने दुकानदाराला विचारले “तुझे घर कुठे आहे?” जेव्हा दुकानदाराने घराची माहिती दिली त्यावेळी खोटे बोलत आहे असा आरोप करण्यात आला. आणि दुकानदाराच्या कानशिलात मारली तात्काळ पोलीस आणि समोर येत दुकानदाराला काठीचा धाक दाखवला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दुकानदाराला दुकान बंद करण्याची ताकीद देऊन तेथून निघून गेले.

दुकानदाराने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं”माझं दुकान बंद होतं. तरी पोलिसांनी ते उघडलं. अधिकाऱ्यांनी माझ्या कानशिलात लगावली आणि पोलिसांनी दांड्याचा धाक दाखवला”. या व्हिडिओ ची दखल मध्यप्रदेश सरकारने घेत जिल्हाधिकारी यांचे वागणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. गरज पडल्यास आम्ही अधिकाऱ्यावर कारवाई करू असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.