
अभिनेत्री स्वरा भास्कर ने शाहरुख बद्दल केलेल्या पोस्ट ने अख्ख्या बॉलिवूड मध्ये धुमाकूळ घातला…!
देशात सध्या चर्चेचा विषय म्हणजे शाहरुख च्या मुलाला ड्रग्ज प्रकरणी झालेली ताबडतोब अटक.मुंबई च्या समुद्रात क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान गेल्या जवळपास १५ दिवसांपासून तुरुंगात आहे.
बुधवारी एनडीपीएसच्या विशेष न्यायालयानं आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबरला सुनावणी होणार असली, तरी इकडे एनसीबीच्या विशेष न्यायालयातील सुनावणीमध्ये या तिघांच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
या परिस्थितीत बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने केलेले ट्वीट सध्या खूप चर्चेत आहे.खरंतर अभिनेत्री स्वरा भास्कर ही सोशल मीडिया पोस्टद्वारे अनेक विषयांवर बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. नुकताच स्वराने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आहे.
‘चांगले वर्तन कसे असावे याचे शाहरुख खान एक उदाहरण आहे. माझ्यासाठी, एक आदर्श व्यक्ती म्हणून त्याच्याकडे सर्व गुण आहेत. वैयक्तिकरित्या तो माझ्यासाठी प्रेरणाही आहे. त्याच्यासाठी आणि गौरीसाठी मी प्रार्थना करत आहे’ या आशयाचे ट्वीट स्वराने केले आहे.
स्वरा भास्करसोबतच इतर बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खानला पाठिंबा दिला होता. आता स्वराने देखील ट्वीट करत पाठिंबा दिला आहे. ७ तारखेला झालेल्या सुनावणीमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता.
ही न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत असल्यामुळे त्यावर पुन्हा सुनावणी घेण्यात आली. यावेळी आर्यन खान आणि इतर आरोपींची पुन्हा ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.खरंतर स्वरा भास्कर या ट्विट च्या माध्यमातून नेमकं काय सांगू इच्छिते याच कोडं मात्र अजूनही उलगडलं नाही.
तिने शाहरुख चा संयम बघून हे ट्विट केलंय की आर्यन ची वाढती कस्टडी बघून केलंय हा प्रश्न जणू नेटकऱ्यांना पडला आहे.नुकताच केलेली ही ट्विट मात्र अख्ख्या बॉलिवूड मध्ये चर्चेचा विषय बनली आहे,आर्यन खान ला अद्यापही जामीन मिळाली नाही उलट त्याला आणखी काही दिवस तुरुंगात राहावं लागेल,कारण त्याच्या व्हाट्सप च्या माध्यमातून आणखी काही रहस्य बाहेर येत आहेत असं दावा NCB अधिकाऱ्यांनी केला आहे.