अभिनेत्री रेखा म्हणाली, मला विचारा विवाहित पुरुषाच्या प्रेमात पागल होण म्हणजे काय – रेखाचे इशारा होता कुणाकड?

0

चित्रपट तारकांची प्रेमप्रकरण नेहमीच उत्सुकतेचा विषय असतात.पडद्यावर प्रेमाचा अभिनय करणार हे तारांगण त्याच्या वास्तव आयुष्यात प्रेमात पडल्यावर त्यांच्या निवडीची तसेच वर्तणुकीची चर्चा सातत्यान होत असते.त्यातच जर हे स्टार यशस्वी असतील आणि त्यांची आपसातच जोडी जमली तर चर्चेला उधाण येत.रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी सध्या चर्चेत असून त्यांच्या लग्नाच्या सातत्यान वावड्या उठत असतात.

अशाच काही जोड्या 80 च्या दशकात गाजल्या.पैकी ऋषी कपूर नितू सिंग, अजय देवगण, काजोल या जोडप्यांची प्रेमप्रकरण खुमासदारपणे चर्चिली गेली.या जोडप्यांनी एकमेकासोबतच विवाह केला.दरम्यान काही जोड्या मात्र विवाहित होऊ शकल्या नाहीत. त्यापैकी अजूनही ज्या जोडीच्या प्रेमाची चिरतरुण चर्चा होते ती म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा होय.

अभिनेत्री रेखा सध्या अविवाहित असून आपली सदाबहार उपस्थिती ती विविध शोमध्ये लावत असते.स्वताच सौंदर्य आणि फिगर सांभाळणाऱ्या रेखाचे फॅन फॉलोअर्स काही कोटींच्या घरात आहेत.सुपरस्टार अमिताभ बच्चनही यात मागे नाहीत व ते अजूनही चित्रपटात विविध भूमिका निभावत आहेत.80 च्या दशकात या जोडगोळीचे अनेक चित्रपट पडद्यावर गाजले असून त्यांच प्रेमप्रकरणही गाजर होत.

अमिताभ यांनी जया भादुरी यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांचे रेखाशी प्रेमप्रकरण सुरू झाल.दरम्यान अमिताभ यांनी रेखाशी विवाह केला नाही.रेखा मात्र बच्चन यांच्या प्रेमात पागल झाल्या होत्या.,त्याचाच एक नमुना सध्या एका रियालिटी शो दरम्यान समोर आला.जय भानुशाली याने रेखा व नेहा कक्कर यांना विचारल, “तुम्ही पाहिल आहे का एखादी स्त्री जी एका पुरुषाच्या प्रेमात वेडी आहे जो की विवाहित आहे.” यावर रेखा पटकन म्हणाली, “मला विचारा विवाहित पुरुषाच्या प्रेमात पागल होण म्हणजे काय?”यावर नंतर रेखा उत्तर देत टाळल सेटवर मात्र हशा आणि टाळ्या यांचा कडकडाट झाला.

रेखाचा हा इशारा स्वतःकडे असून ज्या विवाहित पुरुषाच्या प्रेमात ती पागल आहे तो अमिताभ बच्चन आहे, हे सांगायला कोणा वैज्ञानिकाची गरज नक्कीच नाही.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.