
चित्रपट ‘छिछोरे’ आणि ‘बापमाणूस’ या मालिकेतील अभिनेत्री अभिलाषा पाटील हिचे कोरोनाने निधन
झी युवा वाहिनीवरील ‘बापमाणूस’ या मालिकेतील नायिका पल्लवी पाटील हिच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री अभिलाषा पाटील हिचे ४ मे रोजी कोरोनाने दुखद निधन झाले. कोरोना समाजातील सर्वच स्तरात आढळत असून अशाप्रकारे एका हरहुन्नरी अभिनेत्रीचे कोरोनाने निधन होणे दुखद ठरले आहे. अभिलाषा पाटील मराठी इंडस्ट्रीबरोबरच बॉलीवूडमध्येही अभिनयाची छाप सोडत होती. छिछोरे, मलाल, गूड न्यूज, बद्री की दुल्हनिया अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटात तिनी भूमिका निभावल्या होत्या. मराठी चित्रपटात तिनी प्रवास, बायको देता का बायको, ते आठ दिवस असे चित्रपट केले होते. नंदेश उमप यांच्या शिवसोहळा कार्यक्रमात जिजाऊंची भूमिका साकारली होती.
अभिलाषा पाटील नुकतीच वाराणासीत एका अगामी चित्रपटाचे शूटींग करत होती. परंतु वारणासीहून मुंबईत घरी परतल्यावर तीला कोविडची लक्षण जाणवली, त्यावर टेस्ट केली असता ती पाॅझीटिव्ह आली. दरम्यान सेल्फ क्वारंटाईन होत तिने कोविड औषधोपचार घ्यायला सुरुवात केली होती. परंतु श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तिला आयसीयूत भरती केल गेल होत, परंतु प्रकृती बिघडून शेवटी कोरोनान तिची प्राणज्योत मालवली.
अभिलाषा पाटील हिला आयुष नावाचा एक मुलगा आहे. तरूण वयात एक्झीट घेतलेल्या या अभिनेत्रीच्या निधनान मराठी व हिंदी चित्रसृष्टीतील अनेक कलाकार शोकमग्न आहेत. बापमाणूस मालिकेत तिच्या मुलीची भूमिका निभावलेल्या पल्लवी पाटीलने तिला श्रध्दांजली वाहत एक पोस्ट केली आहे, त्यात ती म्हणते, “खूप मेहनत घेऊन काम करत होतीस बापमाणूसला आपण भेटलो होतो….आई होतीस माझी….नुसत enjoy अस म्हणून काम करायचीस. भूतकाळात तुला संबोधताना त्रास होतोय…. जिथे असशील तिथेही खूप काम करत राहा.”
अभिनेत्री अभिलाषा पाटील हिला प्राईम महाराष्ट्र टिमकडून भावपूर्ण श्रध्दांजली. मित्रांनो लेख आवडल्यास आमच्या पेजला लाईक करा. लेख जरूर शेअर करा.