मराठी हिरो आणि हिरॉईन एका चित्रपटासाठी इतक मानधन घेतात…ऐकून व्हाल चकीत…स्वप्निल जोशी आहे सर्वांत महागडा हिरो

0

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकली असून उत्तम चित्रीकरण, बजेट, असे बदल मराठी चित्रपटसृष्टीत दिसून येत आहेत. मराठी चित्रपट तिकीटबारीवरही चालू लागले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत हिरो, हिरॉईन कोटी, अब्ज मानधनाची वल्गना केली जाते. सद्यस्थितीत मराठी कलाकरही यात मागे नसून त्यांचही मानधन अचंबित करायला लावणार आहे. या कलाकारांना त्यांच्या अभिनयाच्या बदल्यात पैसे मिळतात तरी कीती? चला जाणून घेऊया.

१) सई ताम्हणकर…. स्वताच्या बोल्ड अंदाजाने चर्चेत असणारी सई एका हिंदी चित्रपटातही झळकलेली आहे. बिनधास्त सई बिकीनी घालायला कचरत नाही. बोल्ड सीन गाजवणारी सई मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून सोशल मिडीयावरही तिचे १ मिलियन फॉलोअर्स आहेत. दुनियादारी, मितवा या चित्रपटात झळकलेली सई ताम्हणकर या सर्व लोकप्रियतेच्या बळावर एका चित्रपटासाठी २० लाख रुपये मानधन घेते.
२) अमृता खानविलकर…. एका रियालिटी शोमधून पुढे येत सूत्रसंचालक ते अभिनेत्री असा प्रवास करणारी अमृता खानविलकरही बोल्ड अंदाज ठेवते. नटरंग सिनेमातील तिची वाजले की बारा ही लावणी आविस्मरणीय ठरली आहे. हिंदी डान्स रियालिटी शोदेखील तिने गाजवला आहे. अमृता खानविलकर एका चित्रपटासाठी १० ते १२ लाख रुपये मानधन घेते.
३) उर्मिला कोठेरे…. दुनियादारी चित्रपटात एकतर्फी प्रेमिकेची भूमिका निभावणारी उर्मिला इनोसंट भूमिका चपखलपणे करते. टाईमपास चित्रपटातही तिने अभिनयाचा ठसा उमटवला होता. उर्मिला कोठारे एका चित्रपटासाठी ७ लाख रुपये घेते.
४) सोनाली कुलकर्णी…. मराठी चित्रपटसृष्टीत नटरंग सिनेमा मैलाचा दगड ठरला होता. या सिनेमात सोनालीने अप्सरा आली या लावणीवर धमाल उडवून दिली होती. हिरकणी या नायिकाप्रधान चित्रपटात सोनालीने अभिनयाची पराकाष्ठा केली होती. सोनली कुलकर्णी एका चित्रपटासाठी १२ लाख रुपये घेते.
या झाल्या मराठी नायिका, मराठी नायक उससेभी बढचढकर आहेत. चला बघू त्यांच मानधन
१) अंकुश चौधरी…. अभिनेता अंकुश चौधरीचे चित्रपट आणि सुपर हिट असा फार्म्युला ठरलेला असून अंकुशचे दुनियादारी, डबलसीट, दगडी चाळ, गुरु या चित्रपटांनी थियटर हाऊसफुल्ल केलेली आहेत. नाटकापासून सुरुवात करत अंकुशने मोठा पडदा गाजवला. अंकुश चौधरी एका चित्रपटासाठी ३० लाख रुपये मानधन घेतो.
२) अनेक प्रसिध्द व्यक्तींच्या जीवनरेखा साकारणारा सुबोध भावे स्त्री भूमिकाही उत्तम करतो. बाल गंधर्व, आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, बाळ गंगाधर टिळक अशी पात्र सुबोध भावेने साकारली आहेत.सध्या त्याने तुला पाहते रे मालिकेत ग्रे शेडची भूमिका निभावली आहेत. सुबोध भावे एका चित्रपटाचे १० लाख रुपये मानधन घेतो.
३) उमेश कामथ…. उमेश कामथ हा एक देखणा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत कायद्याच बोला या चित्रपटातून पुढे आला. येरे येरे पैसा हा उमेशचा चित्रपट खूपच गाजला. उमेश कामथ प्रॉडक्शन करत असून त्याच दादा एक गुड न्यूज आहे हे नाटक चांगलच गाजत आहे. उमेश कामथ एका चित्रपटासाठी ११ लाख रुपये घेतो.
४) स्वप्निल जोशी…. बी आर चोप्रांच्या बॅनरखाली स्वप्निल जोशीने कृष्णाची भूमिका गाजवली. मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी इमेज असणार्या स्वप्निल जोशीने मराठी चित्रपटसृष्टी गाजवण्याबरोबरच हिंदीचा छोटा पडदाही गाजवला आहे. स्वप्निल जोशी मराठीतील सगळ्यात महागडा कलाकार असून तो एका चित्रपटासाठी ५० लाख रुपये मानधन घेतो.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.