मातीची काळजी करणारा जमिनीवर पाय असलेला अभिनेता सयाजी शिंदे

0

अभिनेता सयाजी शिंदे तसा अभिनय क्षेत्रात चांगलाच नामांकीत आहे.मोजक्या मराठी,हिंदी चित्रपटांसह त्यानी अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केल आहे.तामिळ,तेलगु,कन्नड अशा अनेक भाषात त्यानी चरित्र भूमिका नाहितर खलनायक रंगवला आहे.सातारच्या या मराठी भाषिक तरुणान आपल अभिनय क्षेत्र समृध्द केलेल आहे.

सयाजी शिंदे त्याच्या साध्या राहणीमानान अनेकांची मन जिंकत असतो.प्रत्यक्ष आयुष्यात पर्यावरणवादी असलेल्या सयाजी शिंदेच वृक्षप्रेम सर्वांनांच परिचयाच आहे.आईनंतर झाडच आपल्याला आॅक्सीजन देऊन वाढवतात अस तो म्हणतो.त्यान त्याच्या आईच्या आठवणीत वृक्षारोपण योजना सुरू केली असून त्याअंतर्गत झाड लावण्याच काम तो करतो.

नुकतच आॅक्सीजनच महत्व सांगणार्या अनेक घटना समोर येत असून त्यावर भाष्य करत सयाजी म्हणतो माणसान कितीही पैसा मिळवला तरी त्याला मानसिक समाधान आणि शांतता हवी असते झाडाखाली बसल्यास हे दोन्ही मिळत.तुम्ही एसी गाडीतून उतरून गाडी झाडाखाली सावलीत लावता यावरून सावलीच महत्व तुम्ही समजू शकता.थोडक्यात जमिनीवर पाय असणारा पडद्यावरील हा खलनायक प्रत्यक्ष आयुष्यात संवेदनशील आणि पर्यावरणवादी आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.