रोहित पवारांच्या प्रयत्नांमुळे अपघातग्रस्त सतीशला मिळाले नवे आयुष्य!

0

आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेड या मतदार संघामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवताना दिसून येतात. त्यांनी आत्तापर्यंत शिक्षण, आरोग्य, महिलांचे प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्यांनी चांगले काम केलं आहे. ते सातत्याने नाविन्यपूर्ण काम करण्यात अग्रेसर असतात. अशीच त्यांच्याकडे आरोग्याचा विषय घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला त्यांनी सहकार्य केले आहे.

जामखेड येथील सतीश अप्पासाहेब माने या 30 वर्षीय युवकाला आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाल्याने नवे आयुष्य रुग्णाला मिळाले आहे.

सतीश यांचा काही महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातांमध्ये पायाला मोठी इजा झाली होती. दवाखान्यामध्ये उपचार घेत असताना त्यांच्या पायामध्ये रॉड बसवावा लागला होता. काही कालावधीनंतर पाय बरा होणे अपेक्षित होते, मात्र तसे न होता पायामध्ये विष तयार होऊन पाय पूर्ण निकामी होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यावेळी रुग्णाच्या कुटुंबीयांनी आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क केला. रोहित पवार यांनी तात्काळ लक्ष घालत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.

 

एक लाखापर्यंत उपचार खर्च डॉक्टरांनी सांगितला होता. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सतीशला पुण्यातील नामांकित रुग्णालयात दाखल करून सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. तिथे उपचार घेऊ नये यांच्या प्रकृतीमध्ये बसली सुधारणा झाली नाही. स्वतः आमदार रोहित पवार यांनी माहिती घेत तज्ञ डॉक्टरांशी बारामती येथे भोईटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

२४ जून रोजी सतीशवर डॉ. भंडारे यांनी स्किन ग्राफ्टींगची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. सतीशचा तो पाय कापावा लागणार होता, मात्र तसे करण्याची वेळ आली नाही. आता सतीश पूर्ण ठणठणीत बरा होऊन पूर्वीप्रमाणेच चालायला लागेल. रोहित पवार यांच्या या जागरूक पणामुळे फार मोठा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.