
वयाच्या चौथ्या वर्षी अपघात, डॉक्टरांनी म्हटलं आता चालुही शकणार नाही,पण आज आहे प्रसिद्ध सेलेब्रिटी नृत्यदिग्दर्शक!
लहानपणापासून माणूस वेगवेगळे स्वप्नं बघत असतो,कधी वाटतं डॉक्टर व्हावं, नंतर वाटत ऍक्टर व्हावं,इंजिनिअर बनावं पण होतो तेच जशी परिस्थिती आमच्या आयुष्यात निर्माण झालेली असते. आज एका अश्याच व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत, जीचं स्वप्नं तर होता वेगळा पण आज बॉलिवूड मध्ये तिची एक वेगळीच छाप आहे.
रिऍलिटी शोच्या माध्यमातून शक्ती मोहन हा चेहरा सर्वांसमोर आला. पाहता पाहता शक्तीनं आपली वेगळी ओळख या कलाविश्वात प्रस्थापित केली. तिला बालपणापासून नृत्याची विशेष आवड. शिक्षणातही कायम पुढे असल्यामुळे आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न शक्ती उराशी बाळगून होती.
पण, नशीबात मात्र काही वेगळंच लिहिलं होतं. ज्यामुळं तिला आयएएस अधिकारी होता आलं नाही.आता डान्स च्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय शक्तीने घेतला तेव्हा तिनं या कलेचं रितसर प्रशिक्षण घेतलं. यासाठी 2006 मध्ये ती मुंबईत आली.
2009 मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या रिऍलिटी शोमध्ये शक्ती सहभागी झाली आणि तिनं या कार्यक्रमाचं जेतेपद मिळवलं. पुढे आणखी एका रिअलिटी शोमध्येही ती झळकली.वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार शक्ती 4 वर्षांची असताना तिच्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली होती.
एका अपघातामध्ये तिचा पाय आणि कंबर या अवयवांना जबर दुखापत झाली होती. अनेक महिने ती रुग्णालयातच होती. ती कधीही चालू शकणार नाही असं तिच्या आईवडिलांना डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण, आपल्या मुलीच्या आत्मविश्वासावर तिच्या वडिलांचा पूर्ण विश्वास होता.
ती चालेल आणि उत्तुंग शिखरं गाठेल याची त्यांना हमी होती. आजच्या घडीला शक्ती त्याच यशाच्या शिखरांवर आहे. जणू काही वडिलांची स्वप्न साकारकरण्यासाठीच ती इथं आली आहे.सध्या शक्ती एक सेलिब्रिटी नृत्यदिग्दर्शक असून, ती रिऍलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही जबाबदारी बजावत आहे.
शक्तीचा संघर्ष आणि स्वतःला झोकून देण्याची ती तयारी तिला आज या यशाच्या शिखरावर घेऊन आली हे मात्र विशेष!आयुष्यात खूप अडचणी येतात,कधी तर माणसाच्या मनातील आत्मविश्वास आणि जगण्याची उमेदच हरवून जाते,अश्या परिस्थितीत सुद्धा स्वतःला कस सावरायच आणि आपलं ध्येय गाठायचं, ह्याच ज्वलंत उदाहरण म्हणजे शक्ती.