
‘आई कुठे काय करते’ मालिकेत अभिषेक आणि अनघाचा साखरपुडा संपन्न
आई कुठे काय करते या मालिकेत सातत्याने ट्विस्ट झालेले प्रेक्षकांना बघायला मिळत आहेत. गृहीणी असलेली नायिका आणि दुसर्या नायिकेच्या प्रेमात असलेला नायक अस मध्यवर्ती कथानक असलेल्या या मालिकेत या दोघांच्या तीन मुलांमुळे सातत्याने चढ उतार होत असतात. सध्या या मालिकेतील देशमुख कुटुंब त्यांच्या गावी गेलेले पाहायला मिळत असून इथे नायक अनिरुदध्द पत्नी अरुंधतीला ‘मी तुझ्याकडे परत येण्यास तयार आहे’.अस सांगण्याचा प्रयत्न करत असून अरुंधती त्याला स्पष्ट नकार देते.
मालिकेत अनिरुध्द आणि अरुंधती या दोघांचा मुलगा अभिषेक आणि अनघा यांचा साखरपुडा झालेला दाखवणार आहेत. या सोहळ्याचे काही क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहोत. साखरपुड्यात गौरी, यश आणि ईशा यांनी नृत्य केलेल दाखवल असून यात अभि व अनघानेही ठेका धरला आहे. येत्या काही दिवसात प्रेक्षकांना या सोहळ्याचे एपिसोड बघायला मिळणार आहेत. मालिकेत संजनाही स्वताच्या लग्नाची तयारी करताना दाखविली असून देशमुख कुटुंबापाठोपाठ गौरीसह संजनाही गावी दाखल झाल्याच दाखवल आहे. गौरीच्या येण्याने खुष झालेला यश संजनाच्या येण्यावर काय प्रतिक्रिया देतो? मालिकेला काय वळण लागते हे येत्या काही भागात प्रेक्षकांना दिसणार आहे.
मालिकेत ईशाचे पात्र साकारणार्या अपूर्वा गोरे या अभिनेत्रीला हिंदी मालिका वागळे की दुनियामध्ये ब्रेक मिळाला असून लवकरच ती या मालिकेत दिसून येईल परंतु आई कुठे काय करते या मालिकेतून एक्झीट घेणार का? हे येत्या काही दिवसात समजेल.