
मातृत्वाची नवी व्याख्या कोरोना काळात आई गमावलेल्या नवजात शिशूंना ही अभिनेत्री करणार स्तपान
आईचे दूध बाळासाठी सर्वोत्तम असून आईच्या दुधात उत्तम पोषणद्रव्य असतात. मुलाला उत्तम आरोग्य आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आईचे दूध आरोग्यवर्धक असून आईच्या दूधाने बाळाचे चांगले पालन पोषण होते. आई आणि बाळात वात्सल्य वाढण्याला स्तनपान कारणीभूत आहे. बाळाला किमान १ वर्ष तरी स्तनपान करायला लावणे गरजेचे असून त्यानंतर वरचा आहार देणे गरजेचे ठरते.
बर्याच दुर्दैवी घटनात नवजात शिशूला आपली आई गमवावी लागते अशावेळी बाळाला आईच्या दूधाची गरज भासते. अशा बाळाची भूक भागवण्यासाठी पावडरचे दूध करून त्याला पाजवले जाते. आणि त्या चिमुरड्याची भूक मागवली जाते. बाळाला आईच वात्सल्य जाणवण्यासाठी बाळाला स्तनपान जरुरीच आहे. अशा बालकांचे दूख ओळखून एका अभिनेत्रीने पुढाकार घेतला असून मुंबईतील प्रोडक्शन मॅनेजर आणि एक सेलेब्रिटी रोनीता कृष्णा यांनी या कार्यामध्ये पुढाकार घेतला आहे. ज्या नवजात शिशूंनी काही आजारांनी आपल्या आईला गमावले आहे. किंवा आजारी आहे अशा मातांच्या मुलांना स्तनपान करण्यास सुरुवात केले आहे.
या संदर्भात त्यांनी एक ट्विट पाहिले होते. दिल्लीमधील एका महिलेने आपल्या नवजात शिशूसाठी स्तनपान कोण करू शकेल का? असा प्रश्न विचारला होता. रोनीता यांना रेखी म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी विचार आपल्या पतीकडे व्यक्त केला तेव्हा त्यांचे पती मोहसीन यांनी त्यास स्वीकृती दिली.
आजच्या स्वार्थी जगात आपल्या लेकरांच साधे चॉकलेटदेखील कोणी दुसर्या लेकराला देत नाही. मात्र रेखी स्वताच्या लेकीच्या हक्काचे दूध इतर लेकरांना देण्यासाठी पुढे आली आहे. खरोखर त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.