हा सुपरस्टार अभिनेता अभिनय सोडून बनला अॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आणि बेवारस प्रेतांचे करतोय अत्यंसंस्कार

0

कोरोनाची दुसरी लाट भारतात जलदगतीने फैलावली आणि सरकारने परत लॉकडाऊनचे आदेश काढले. लॉकडाऊनमुळे अनेकजणांचा रोजगार गेला. काहीजण वर्क फ्राॅम होम करू लागले आहेत. प्रसंग बाका असल्याने सगळ्यानींच मदतीचा हात पुढे केला आहे. या मदतीत अन्नदान, औषधे, इ अत्यंत निकडीच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न सक्षम वर्गाकडून केला जात आहे. या प्रयत्नात काही कलाकारही अग्रभागी होत गांजलेल्यांना मदत करत आहेत. या लेखात अशाच एका कन्नड अभिनेत्याची रियल लाईफ हिरोगिरी जाणून घेणार आहोत.

गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये अभिनेता सोनू सूदने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहचविण्याचे काम करण्याबरोबरच अन्नदान, धान्य पुरवठाही केला होता. यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये टाटा, रिलायन्स फौउंडेशन यांनी आॅक्सीजन पुरवठ्यात मदत केली. समाजातील अनेक दानशूर पुढे येत कोविड सेंटर्स उभारली गेली. सद्यस्थितीत कोविडची दुसरी लाट आली असून त्यात व्हेंटिलेटर लागणार्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अशा रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज असून त्यासाठी त्यांना अॅम्ब्युलन्सची गरज भासते, हीगरज ओळखत एका रफ अँड टफ कन्नड अभिनेता अर्जुन गौडा याने काही दिवस अॅम्ब्युलन्सची ड्रायव्हरकी सुरू केली आहे.

अर्जुन गौडा म्हणाला, ” मी गेले काही दिवस कोरोना रुग्णांचे हाल बघत असून त्यांना वेळेवर रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते. म्हणूनच मी अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर झालो असून अत्यावस्थ रुग्णांना मी दवाखान्यात पोहोचवतो. तसेच ज्यांना कोणीही भेटायला येत नाही त्यांचे अंत्यसंस्कारही करतो. हे ऐकून माणुसकी जीवंत आहे अजून इतकच वाटते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.