
आज आपण जरा हटके विषय पाहणार आहोत. तंबाखू हा तसा ग्रामीण भागात सर्रास उगवला तसेच वापरला जाणारा पदार्थ. तर या तंबाखूची वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. भारतात उष्ण कटिबंधात सर्वच ठीकाणी तंबाखूची शेती केली जाते. तंबाखू हे एक नगदी पीक आहे. भारतीय पुराणतही तंबाखूचा उल्लेख आढळतो. तंबाखूचा वापर धूम्रपानासाठी तसेच खाण्यासाठी केला जातो. या दोन्हीचा आरोग्यावर हानिकारक परिणाम असून कर्करोगही होऊ शकतो. परंतु तंबाखूचा औषधी वापरही केला जातो जो फायदेशीर ठरतो. चला मित्रांनो तंबाखूचा औषधी वापर बघू.
तंबाखूचा कल्कलिया, पुरबी, सुरती, गुजराती असे प्रमुख प्रकार आहेत. तंबाखूमुळे कॅन्सर होतो हे सत्य आहे. परंतु औषधी वनस्पती म्हणून तंबाखूचा वापर केल्यास त्याचे फायदे होऊ शकतात. तंबाखूचे सेवन योग्य तज्ञांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात व योग्य वेळी केल्यास त्याचा फायदा होतो.चला तर मग पाहुया तंबाखूचे फायदे.
१) खोकला झाल्यास तंबाखूच्या लाकडांना जाळून त्यातील १२ मिलीग्रॅम राखेमध्ये २ मिलीग्रॅम काळे मीठ मिसळून सेवन केल्यास खोकला बरा होतो. तंबाखूची पाने कफ व वातनाशक आहेत.
२) दातांमध्ये वेदना होत असल्यास मीठ आणि तंबाखू यांच्या बारीक मिश्रणाने मंजन केल्यास दातदुखी, हिरड्यांची सूज दूर होते. दात किडणे थांबते. परंतु सतत तंबाखू सेवन केल्यास गालाला जखम होऊन कॅन्सर होऊ शकतो.
३) दमा किंवा श्वास लागत असल्यास तंबाखूची पाने जाळून २५० मिलीग्रॅम राखेला विड्याच्या पानात घेऊन सेवन केल्यास दम्यात आराम मिळतो.परंतु यात तंबाखू गिळू नये.केवळ रसपान करायचे आहे.
४) केसगळतीची समस्या असल्यास २० ग्रॅम तंबाखू आणि २५ ग्रॅम कण्हेरीची पाने जाळून त्या राखेत १०० मिलीलिटर मोहरीचे तेल मिसळून ते मंद आचेवर गरम करा, थंड झाल्यावर केसांना लावा. केस गळती थांबते.
मित्रांनो वरील उपाय करण्यापूर्वी तज्ञ वैद्य किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. ते तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला प्रमाण औषध देतील. माहिती आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. लेख जरुर शेअर करा.