अबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक लाखांचा दंड!

0

पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांचे महत्त्व महत्वपूर्ण आहे. निसर्गाचा समतोल राखला जातो तो वृक्षांच्या मुळेच. मात्र अवैधरीत्या होणारी वृक्षतोड आज पर्यावरणास हानिकारक ठरत आहे. डोंगरे ओसाड झाले आहेत ती फक्त अवैद्य झाड तोडणार्यांच्या मुळे.

लातूर शहरातील शिवाजीनगर परिसरात महानगर पालिकेने एका डॉक्टरला झाडे तोडल्यामुळे तब्बल एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. लातूर शहरातील शिवाजीनगर भागातील आकाश कॉम्प्लेक्सपुढे ३० फूट उंचीची बदामाची दोन झाडं होती. या झाडांचा आकाश कॉम्प्लेक्स येथे होत असल्याने अनाधिकृतपणे डॉक्टर सोमानी यांच्या सांगण्यावरून दोन झाडे रात्रीच्या वेळेत तोडण्यात आली.

मात्र अनधिकृतपणे रस्त्यावरील झाडे तोडल्याची बाब पुढे आली असल्याने महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडाचे जतन अधिनियम १९७५ कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनपा आयुक्त अमन मित्तल यांनी तब्बल एक लाखांचा दंड Fine ठोठावण्यात आला आहे.

मात्र सारवासारव करण्यासाठी डॉक्टरांनी चांगलीच शक्कल लढवली आहे. झाडे तोडलेल्या ठिकाणी दोन झाडे त्यांनी लावली आहेत मात्र तरीही त्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंड करण्यात आला आहे. व तशी नोटीसही पाठविण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.