
आमिर खानचा कुटुंबाबत धक्कादायक खुलासा; चित्रपटांमुळे कुटंबिय झाले दूर ….!
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या सुपरस्टार आमिर खान याने त्याच्या जीवनातील प्रवसातील काही मुद्दावर बोलला. त्यात त्याने सांगितले की, एक काळ असा होता की त्याला अभिनय सोडावासा वाटतं होता.शनिवारी एका कार्यक्रमात आमिर सांगितले की, मला माझ्या वैयक्तिक कारणांमुळे चित्रपटसृष्टीला अलविदा करायचे होते. गेल्या दोन वर्षांत असे काही क्षण आले जेव्हा वाटले की बस आता ही चंदेरी दुनिया सोडून जावे. असे विचार त्यांच्या मनात वैयक्तिक आयुष्य आणि इतर कारणांमुळे आले होते. मात्र तो पुन्हा चित्रपटसृष्टीत आला, त्याने काम पुन्हा सुरू केले, आपला निर्णय कसा बदलला यावर ही आमिर बोलला.
तेसच अमिर खान बोलला की, धन्यावाद… मला या गोष्टी लवकर कळाल्या. या गोष्टी जर 86 व्या वर्षी समजल्या असत्या तर मी त्यात सुधारणा करू शकलो नसतो. पण माझ्याकडे अजून वेळ असून मी त्या चुका सुधारायला सुरुवात केली आहे. यावर अमिरला विचारले की, तु सिनेमाला दोष देत आहेस का? यावर त्याने, चित्रपटांनी त्याला कुटुंबापासून दूर नेले, असं तो म्हणतो. तर त्यावेळी त्याच्या मनात हे सगळं सोडावं आणि फक्त चित्रपट निर्मिती करावी, असं वाटतं होतं. याबाबत तो घरच्यांशी बोलला तेव्हा त्याच्या कुटुंबालाही आश्चर्य वाटले, असं तो म्हणाला.
करिश्मा कपूर पुन्हा तयार केलेल्या प्रसिद्ध निरमा जाहिरातीत झळकली
तसेच तो काळ असा होता की, ‘त्याला वाटू लागले होते की तो स्वार्थी झाला आहे. आणि सर्व काही मागे टाकून तो फक्त त्याचे काम करत आहे. ‘मी हिरो (Hero) झालो, त्यामुळे माझे कुटुंब माझ्यासोबत आहे असे मला वाटले. मी माझ्या कामात पूर्णपणे हरवून गेलो. मी हे सगळे हलकेच घ्यायला सुरुवात केली पण नंतर मला जाणवले की मी हे 30-35 वर्षे सतत करत आहे. मग मला असे वाटले की मी एक सेलफिश बनलो आहे आणि फक्त माझ्याबद्दलच विचार करत आहे. तर एक वेळ अशी आली जेव्हा त्याला वाटू लागले की आपण आपल्या कुटुंबाला आणि मुलांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळेच अभिनय (Acting) सोडण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता.
आमिर खानच्या या निर्णयावर तीन महिन्यांनंतर त्याच्या मुलांनी त्याला शांत राहण्याचा आणि जीवन आनंदात जगण्याचा सल्ला दिला. यावेळी त्याची पत्नी किरण राव भावूक झाली होती. तर मुलांनी सांगितले की, तो चुकीचा विचार करत आहे. कारण चित्रपट (Cinema) हाच तुझा श्वास आहे. त्यानंतर मी दोन वर्षे सर्व काही सोडले आणि नंतर परत आलो. या सगळ्या प्रश्नोत्तरांच्या गोंधळात दोन वर्षे खूप कठीण गेली. एवढेच नाही तर आमिर खानने सांगितले की, त्याने दारू देखील सोडली आहे.