या पठ्ठ्याचं एक ट्विट विकलं गेलं चक्क १८ कोटी रुपयांना!

0

ट्विटर ही मायक्रोब्लॉगिंग साईट असून, जगभरातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या या माध्यमाचा वापर करून  माहितीची देवाणघेवाण करत आहे.पण आपल्यान ट्विटला एकप्रकारे पाहायला गेलं तर काडीचीही किंमत नाही. पण, असा एक पठ्ठ्या आहे ज्याच्या चुकीच्या स्पेलिंग असलेल्या ट्विटला सुद्धा कोटींची किंमत मिळाली आहे. नाहीये न विश्वास बसत!

या पठ्ठ्याचं नाव आहे, जॅक डोर्सी. कोण आहे हा? तर हा आहे,  लोकप्रिय सोशल मीडीया असणाऱ्या ट्विटरचा सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याने १५ वर्षांपूर्वी केलेल्या एका ट्वीटला तब्बल १८ कोटी रुपयांना विकल गेलं आहे!

या ट्विटला इतकी प्रचंड किंमत मिळण्याचं कारण तरी काय आहे? जाणून घेऊयात, ट्विटर वरच पहिलं ट्विट आहे जॅक डोर्सी याचं आणि म्हणूनच ते एवढं किमती आहे. एवढंच कारण यासाठी पुरेसं नसून यामध्ये ट्विटरचं स्पेलिंग आजच्यासारखं Twitter असं नाही, तर ते twttr असं आहे. असं असण्याचं कारण म्हणेज त्या वेळी डोमेन नेमचा फायदा घेण्यासाठी अशाच प्रकारे इंग्रजी भाषेतील स्वर काढून टाकून स्पेलिंग लिहिण्याची पद्धत होती.

जॅक डोर्सी यांनी हे पहिलं ट्विट ६ मार्च २००६ रोजी केलं होतं. डिसेंबर २०२० मध्ये हे ट्विट ‘व्हॅल्युएबल्स’ नावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर लिलावासाठी आलं. हा एक एनएफटी प्लॅटफॉर्म आहे. याचा वापर अमूल्य डिजिटल वस्तूंसाठी केला जातो. त्याद्वारे त्या वस्तूंचं वेगळेपण आणि किंमत सिद्ध होते. डिजिटल बाजारपेठेतच याची खरेदी विक्री होऊ शकते.

अशा या डिजिटल प्लॅटफॉर्मवर २२ मार्च रोजी जॅक डोर्सी याचं हे पहिलं ट्विट लिलावासाठी आलं आणि काही मिनिटांच्याच बोलीमध्ये याची किंमत कोटींमध्ये गेली. अखेर ब्रिज ओरॅकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीना एस्तावी यांनी सुमारे १८ कोटी रुपयांना हे ट्विट विकत घेतलं. जॅक डोर्सी यांनी या लिलावातून मिळालेली रक्कम आफ्रिकेतील कोरोना लसीकरणासाठी दान करण्याची घोषणा केली आहे. आफ्रिकेत अधिक घातक नवीन कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.