आर्यन खान च्या प्रकरणात आला नवा “ट्विस्ट”;२५ कोटींची मागणी केल्याचा खळबळजनक दावा..!

0

खरंतर आतापर्यंत आर्यन खान च्या प्रकरणात वेगवेगळे ट्विस्ट आले आहेत, पण नुकताच आलेला ट्विस्ट बघून तुम्हालाही धक्का बसेल.सध्या देशात आर्यन खान च प्रकरण म्हणजे एक चर्चेचा माध्यम ठरला आहे,रोज नवे वळण हा प्रकरण घेत आहे.

नुकताच अनन्या पांडे वर NCB ची धार होती तर आता चक्क NCB अधिकाऱ्यांवर च वेगळाच आरोप लावण्यात आला आहे.काही वेळापूर्वी मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला. आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये मुख्य साक्षीदार असलेल्या किरण गोसावी सध्या फरार आहे.

मात्र किरण गोसावीनं शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली, त्यात 18 कोटींवर डील झाली, असा खळबळजनक दावा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या आरोपाला मात्र ज्यांनी हा सगळा ड्रग्ज चा पर्दाफाश केला ते एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी प्रभााकर साईल यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

काल एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना समीर वानखेडे म्हणाले की, मी प्रभाकर साईल यांच्या आरोपांना योग्य वेळ आल्यानंतर उत्तर देईल.प्रभाकर साईल यांनी NCB च्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि इतर साक्षीदार केपी गोसावी यांच्यावर मोठे आरोप केले आहेत. आरोप करणारा प्रभाकर स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे.

केपी गोसावी हा जो व्यक्ती आहे ज्याचा फोटो आर्यन खानसोबत व्हायरल झाला आहे.खरंतर क्रूझवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि केपी गोसावीला सुमारे 15 मिनिटं निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये एकत्र बोलताना पाहिलं असल्याचा दावाही प्रभाकरनं केला आहे. त्यानंतर गोसावीनं आपल्याला फोन करून पंच होण्यास सांगितलं.

एनसीबीने त्याला 10 साध्या कागदांवर सही करून घेतल्याचंही त्यानं म्हटलं आहे.आपण गोसावी यांना 50 लाख रोख रक्कम भरलेल्या 2 पिशव्या दिल्या. तसंच 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9.45 वाजता गोसावीनं फोन केला आणि 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:30 पर्यंत तयार होऊन एका ठिकाणी येण्यास सांगितलं, असंही प्रभाकर साईल यानं सांगितलं आहे.

गोसावीनं आपल्याला काही फोटो दिले होते आणि ग्रीन गेटवर फोटोमध्ये असलेल्या लोकांना ओळखण्यास सांगितले होते, असं प्रभाकरनं म्हटलं आहे.मात्र अद्यापही याबद्दल समीर वानखेडे यांची स्पष्ट प्रतिक्रिया समोर आलेली नाही,त्यामुळे हा आरोप येणाऱ्या काळात नक्कीच या प्रकरणाला नवा वळण देणार का हा मोठा चर्चेचा विषय सध्या रंगलेला आहे.खरंतर आतापर्यंत ह्या गोष्टी समोर का नाही आल्या,आणि आता जसजसा हा प्रकरण समोर जातं आहे तशी नवे ट्विस्ट सुद्धा अचानक समोर कसे येत आहेत असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.