
लांबसडक केस स्त्री सौंदर्याचे लक्षण आहे यांमुळे स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते परंपराग लांब केसांचा आंबाडा, वेणी, मोकळे केस सुंदर दिसतात. या केसात गजरा माळल्यास केसांचे सौंदर्य वाढते तसेच त्यामुळे एकूणच व्यक्तिमत्वात भर पडते. केस वाढवण्यासाठी बाजारात अनेक तेल उपलब्ध असून आज आपण एक घरगुती उपाय सुचवणार आहोत. याने तुमच्या केसातील समस्या दूर होतील. कोंडा, फूट पडलेले केस, केस गळणे या समस्या दूर होतात.
साहित्य :
१) कढिपत्ता – २ चमचे
२) नारळाच तेल – १ चमचा
३) एरंडेल तेल – १चमचा
कृती :
कढिपत्ता, एरंडेल तेल, आणि नारळाच तेल मिक्स करा. केसांना हे मिश्रण लावा व मसाज करा. तेल केसांच्या मुळापर्यंत लावा. किमान ५ ते ६ मिनिट मसाज करून तेल केसात मुरू द्या आता केस शाम्पूने धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून किमान दोनवेळा करायचा आहे. लवकरच तुमच्या केसांच्या सर्व समस्या दूर होतात.
वरील उपाय घरातल्या घरात होत असून याचा कोणताही अपाय नाही.