“मदतीचा एक घास..म्हणत प्रणिती शिंदे यांनी लाटल्या पोळ्या”!

0

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे सहकार्य करता येईल ते सहकार्य मोठ्या ताकदीने काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेचे विविध नेते करताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये राजकीय पार्श्वभूमी असणारे, तसेच नसणारे बहुसंख्य नेते जमिनीवर उतरून काम करताना दिसत आहेत. अशाच प्रकारे मदतीचा “एक घास या उपक्रमांतर्गत सोलापूर” जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाने मदतीचा हात पुढे केला आहे. गरीब गरजू बेघर तसेच उपाशी असणाऱ्या लोकांना जेवण देण्याचे कार्य काँग्रेस करताना दिसत आहे.

या उपक्रमाला अजून बळकटी देण्यासाठी शक्य तितका वेळ स्वतः महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस प्रभारी आ. प्रणिती शिंदे यांनी पोळ्या लाटून जेवण बनवले.शक्य तितक्या महिलांनी यामध्ये सहभागी घेऊन लोकांना सहकार्य करावं. असा संदेश आ. प्रणिती शिंदे स्वतः पोळ्या लाटून, स्वतः च्या कुटुंबापासून पुढाकार घेऊन दिला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस व प्रियदर्शिनी सेल कडून राबवण्यात येणाऱ्या “मदतीचा एक घास” ह्या उपक्रमा द्वारे आता गरजू लोकांना मिळणार आहे. घरचे जेवण, आपण घरात ज्या पोळ्या करतो, त्यात रोज 10 पोळ्या जास्त करायच्या आणि पाव भर भाजी जास्त करायची, अशी ही संकल्पना आहे. महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पोळ्या, चपाती आणि भाजी जमा करुण गरजू लोकांपर्यंत पोहोचावयी अशी संकल्पना आहे

Leave A Reply

Your email address will not be published.