
कोरोना मुळे घाबरून हंबरडा फोडणाऱ्या गर्भवतीला धीर देण्यासाठी डॉक्टरची जिव्हाळ्याची मिठी.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात जातेगाव नावाचे १०-१२ हजार लोकवस्तीचे हे गाव आहे. त्या ठिकाणी ते रुग्णालय चालवतात. ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. लोकांच्या मध्ये अजुन काही गैरसमज आहेत. तसेच ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रसार चांगलाच वाढला आहे. ग्रामीण भागातील लोक हे आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. त्या साठी सरकार ने यांची टेस्ट केली पाहिजे. सोबतच खाजगी डॉक्टर ला सुध्दा सोबत घेतले पाहिजे.
६ महिन्याच्या कोरोनाबाधित गर्भवतीने घाबरून हंबरडा फोडला. “ताई तू घाबरु नकोस” म्हणत जातेगावच्या डॉक्टर ने मिठी मारत काढली समजूत. कठीण प्रसंगात दिलासा देत डॉक्टर जिवणकुमार राठोड यांची माणुसकी यातून दिसून आली. अंगावर शहारे आणणारा हा प्रसंग आहे. बीड जिल्ह्यात हा व्हिडिओ सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला आहे. सध्या या महिलेवर शासकीय रुग्णालय बीड येथे उपचार सुरू आहेत.
डॉक्टर म्हणाले की “माझे माझ्या सर्व डॉक्टरला आवाहन आहे. की या अडचणीच्या काळात आपण लोकांना सहकार्य करू या, पैसे कमवायला आयुष्य पडले आहे. सध्या आपल्या सहकार्याची गरज आहे”!