Posted in

“२३ जानेवारीला होणार महाराष्ट्रात राजकीय भूकंप”; शिवसेनेच्या माजी खासदारांचा दावा

संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांना शिवसेना पक्षाची चिंता करण्याची गरज नाही. त्याऐवजी, त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या अस्तित्वाची काळजी घ्यावी. जून २०२२ मध्ये जो सूर्य उगवला, तो खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंच्या ऐतिहासिक निर्णयामुळे झाला. शिंदेंनी घेतलेला निर्णय म्हणजेच त्या सूर्याचा उदय आणि सूर्य एकच असतो, दुसरा कधीच होऊ शकत नाही. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी २३ जानेवारीला एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पत्रकार परिषदेत माजी खासदार राहुल शेवाळे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार हे आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आमदारांची संख्या वाचवण्यासाठी खोट्या बातम्या पसरवत आहेत. त्यांच्यानुसार, कॉंग्रेस आणि उबाठा पक्षाचे काही आमदार शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत आणि त्यांची संख्या १५ आणि १० इतकी आहे. यामुळे पक्ष फुटण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. दुसऱ्याच्या उदयापेक्षा तुमच्या अस्ताची काळजी घ्या. २३ जानेवारीला होणारा राजकीय भूकंप, यासाठी खोट्या बातम्या पसरवण्यात येत आहेत. तसेच, उबाठा आणि काँग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेवाळे यांनी असेही सांगितले की, केंद्रातही राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे आणि हे सर्व घडामोडी गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. यावरून, राऊत आणि वडेट्टीवार यांच्या विधानांचा उद्देश पक्षाच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी खोटी माहिती पसरवणे आहे, असा आरोप त्यांनी केला.

राहुल शेवाळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत सांगितले की, या आघाडीचा उद्देश स्वार्थ, सत्तेसाठी आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठी आहे. जेव्हा स्वार्थ आणि सत्ता दूर जातात, आणि पुढील महत्त्वाकांक्षेची दिशा दिसून येत नाही, तेव्हा तिथे बिघाड सुरू होतो. शेवाळे यांनी इशारा दिला की काही नेत्यांना स्वतःचे राजकीय अस्तित्व आणि पक्ष वाचवण्यासाठी हातपाय पसरावे लागत आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आणि बिघाड दिसून येत आहे.

दरम्यान, राहुल शेवाळे यांनी सांगितले की, रायगड आणि नाशिक पालकमंत्र्यांबाबतचा निर्णयामुळे शिवसेना आमदारांमध्ये नाराजी आहे. रायगडमध्ये तीन शिवसेनेचे आमदार असून, नाशिकमध्ये दादा भुसे पालकमंत्री होते. या नाराजीला त्यांच्याच पक्षांतर्गत चर्चा होत आहेत. राहुल शेवाळे यांच्या म्हणण्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सर्व पक्षांसोबत समन्वय साधून काम करत आहेत, आणि या नाराजीवर तोडगा काढतील. हे महायुतीतील अंतर्गत विषय आहेत, त्यामुळे विरोधकांनी त्यावर चिंता करू नये.

Leave a Reply