Posted in

“छगन भुजबळांच्या नाराजीवर प्रफुल्ल पटेलांचं स्पष्टीकरण; आम्ही एकत्र बसून मार्ग काढू”

अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. त्यांनी ही नाराजी खुल्या पद्धतीने व्यक्त केली आहे. त्यामुळे भुजबळ आगामी शिर्डी अधिवेशनात कशी भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुजबळांच्या नाराजीविषयी विचारले असता, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले की, मी दोन तास भुजबळांसोबत बसून होतो असे उत्तर त्यांनी दिले आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केले की, “छगन भुजबळ आणि माझ्यात कोणताही दुरावा नाही. नेहमी आमच्या चर्चा होत असतात. काल (१७ जानेवारी) मी छगन भुजबळ यांच्यासोबत मुंबईत दोन तास गप्पा मारल्या. कुटुंबातील सदस्यांमध्ये काही मुद्दे असू शकतात, पण त्यावर आम्ही एकत्र बसून योग्य मार्ग काढू.”

“आमच्या पक्षातील छगन भुजबळ हे सर्वात ज्येष्ठ आणि महत्त्वपूर्ण सदस्य आहेत. त्यांच्याबद्दल सर्वांना मनापासून आदर आहे. ते महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते आहेत आणि देशभरातील ओबीसी समाजासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे” असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

प्रफुल्ल पटेल यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले, “छगन भुजबळ आणि आमच्यात कोणतीही महत्त्वाची चर्चा नाही. १९-२० किंवा जशी तुम्ही सांगत आहात, तशी काही गोष्ट नाही, पण आम्ही त्यात सुधारणा करू. छगन भुजबळ अधिवेशनाला येतील, आम्ही त्यांच्याशी संवाद साधला आहे. “पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ हे देखील आमचे पक्ष सदस्य आहेत, आणि तेही अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.”

Leave a Reply