आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाचे नेते दौरे करत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे करत आहेत. सध्या राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना काही मोठी वक्तव्ये केली आहेत.
माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंनी सध्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. निवडणूकीच्या येणाऱ्या तीन साडेतीन महिन्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फक्त मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. यासाठी ते खूप धडपड करत आहेत. शरद पवार यांना जातीबद्दल आपुलकी आहे मात्र लोकांच्या जातीबद्दल ईर्षा करणे त्यांच्याकडून हे अपेक्षित नाही. असं राज ठाकरे म्हणाले आहेत,
मी माझे दौरे करतोय. मला यामध्ये कोणताच अडथळा नकोय. माझ्या नादाला कोणी लागू नये. तुम्ही तुमचे राजकारण करा आणि मी माझे करतो. माझ्या वाटेत अडथळे आले तर तुम्हालादेखील या निवणुकीसाठी एकही सभा घेता येणार नाही. समाजात द्वेष निर्माण करुन वाद करुन कोणत राजकारण करताय तुम्ही असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
या सर्व प्रकारात मनोज जरांगे यांचं काहीच देणघेण नाही. ते त्यांच आंदोलन करत आहेत. मात्र शरद पवार आणि उध्दव ठाकरे त्यांच्या आंदोलनाचा फायदा घेऊन स्वतःच राजकारण करतायत. यामध्ये काही पत्रकार देखील सामील झालेत, याच मला आश्चर्य वाटले. असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.