Posted in

“शरद पवार आणि पंतप्रधान मोदींची भेट; राजकीय चर्चाना उधाण!”

आज दिल्लीमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली. शरद पवार यांनी ही भेट राजकीय नसून शेतीच्या विषयाशी संबंधित असल्याचं सांगितलं. सध्या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यानंतर नवीन राजकीय समीकरणांचा विचार सुरू झाला आहे. 12 डिसेंबरला शरद पवारांचा 85 व्या वर्षात वाढदिवस साजरा झाला. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. म्हणून शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट अत्यंत महत्त्वाची ठरते.

शरद पवार आज पंतप्रधान मोदींना भेटले, त्यावेळी सातारा आणि फलटणचे दोन डाळिंब उत्पादक शेतकरी त्यांच्यासोबत होते. या भेटी दरम्यान पवार आणि मोदींनी शेतकऱ्यांच्या डाळिंब पिकावर चर्चा केली. पवार यांनी सांगितले की, ही भेट राजकीय नव्हती आणि पंतप्रधानांना भेट म्हणून डाळिंब दिलं. भेट फक्त पाच मिनिटांची होती, त्यामुळे त्यातून कुठलाही राजकीय अर्थ निघू नये.

मागच्यावर्षी पुण्यात पीएम मोदी आणि शरद पवार यांची एक महत्त्वाची भेट झाली होती. त्या कार्यक्रमात दोघेही एकाच मंचावर होते, आणि पीएम मोदींना सन्मानित करण्यात आलं. या भेटीमुळे राजकारणात चांगलीच चर्चा रंगली होती. शरद पवार आणि मोदी यांची एकत्र उपस्थिती राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात होती, कारण त्यातून विविध तर्क व चर्चा निर्माण झाल्या.

Leave a Reply