Posted in

“‘माझा शेवट झाला, तरी मागणी सोडणार नाही’; मनोज जरांगे यांचा ठाम इशारा”

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे तीव्र मागणी केली आहे. त्यांनी मराठा समाजाला सरसगट आरक्षण देण्याची व त्या संदर्भात सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे आरक्षण लागू करण्याची मागणी केली. याशिवाय, त्यांनी मागणी केली की, राज्य सरकारने ज्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली आहे, त्याची अंमलबजावणी हिवाळी अधिवेशनात करण्यात यावी. मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांवर आधारित मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तसेच मराठा समाजातील तरुणांवर ज्येकेसेस झाल्या आहेत, त्या परत घेण्यात याव्यात. ते म्हणाले की, शिंदे समितीला मुदतवाढ दिली असून, सरकारने ती समिती सक्रिय करावी आणि नोंदी शोधण्याचे काम सुरू करावे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला तात्काळ EWS (Economic Weaker Section) आरक्षण लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ओबीसी आणि ईसीबीसी आरक्षण कायम ठेवण्याचीही आवश्यकता सांगितली. २५ जानेवारीला अंतरवली सराटीमध्ये उपोषण सुरु करणार आहोत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. “सरकार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना शेवटची विनंती आहे, तुम्ही आम्हाला धोका दिला आहे, परंतु आम्ही तुमच्याविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. मराठा समाजाने २५ जानेवारीपूर्वी सर्व मागण्या पूर्ण करून घ्यायचे आहे. उपोषणाला बसणाऱ्यांनी तसेच पाठिंबा देणाऱ्यांनी अंतरवली सराटीमध्ये येऊन आपल्या सर्व वस्तू घेऊन उपस्थित राहावे, असेही त्यांनी आवाहन केले.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले, “आता आरक्षण घेतल्याशिवाय अंतरवाली सोडायची नाही. मी मरायला तयार आहे. मराठा समाजाचा अपेक्षा भंग कधी होऊ देणार नाही.” उपोषणामुळे मला त्रास होतो. “या उपोषणात माझा शेवट होऊ शकतो, परंतु मी मॅनेज होणार नाही, फुटणार नाही.” आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण पाहिजे, मुलांच्या भविष्यासाठी ईडब्ल्यूएस आरक्षण मिळावे. अस जरांगे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply