Posted in

“राहुल गांधींचा गंभीर आरोप; सावरकरांनी संविधानापेक्षा मनुस्मृतीला दिलं प्राधान्य”

संसदेत संविधानावर सुरू असलेल्या चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधी बोलत आहेत. त्यांनी संविधानाला “विचारांचा समूह” आणि “जीवन दर्शन” मानले आहे. राहुल गांधी म्हणाले, “संविधान आमचा सांस्कृतिक विचार आहे आणि त्यात प्राचीन वारसा सामावलेला आहे.” त्यांनी आरएसएसवर टीका करत, “आरएसएसने मनुस्मृतीला संविधानापेक्षा श्रेष्ठ मानले,” असा आरोप केला. सावरकरांनीही संविधानापेक्षा मनुस्मृतीला महत्व दिल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. “संविधानात आम्हाला बाबासाहेबांचे आदर्श दिसतात,” असे ते म्हणाले.

राहुल गांधींनी आपल्या भाषणात द्रोणाचार्य आणि एकलव्याचा उल्लेख करत भाजपावर तीव्र टीका केली. “जसा द्रोणाचार्यने एकलव्याचा अंगठा मागितला, तसा भाजप हिंदुस्तानच्या युवकांचा अंगठा कापत आहे.” त्यांनी आरोप केला की, देशातील सर्व उद्योग अदानीला दिले जात आहेत, आणि उद्योगपतींचा अंगठा कापला जात आहे. “भाजपला देशाची ताकद हिसकावायची आहे आणि शेतकऱ्यांच्या ऐवजी अंबानी व अदानी यांना फायदा पोहोचवला जात आहे. तसेच, पेपरलीक सारख्या प्रकरणांमध्ये युवकांचा अंगठा जात आहे.” अस ते म्हणाले.

राहुल गांधींनी आपल्या भाषणात हाथरस घटनेचा मुद्दा उचलला आणि भाजपवर गंभीर आरोप केले. “आरोपी बाहेर फिरत आहेत, पण पीडित कुटुंब घरात बंद आहे. त्यांना मुलीचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगी दिली नाही,” असे ते म्हणाले. “मी हाथरसच्या पीडित कुटुंबाची भेट घेतली. आरोपी पीडित कुटुंबाला धमकावत आहेत. यूपीमध्ये संविधान नाही, मनुस्मृती लागू आहे.”असे ते म्हणाले. त्यांनी भाजपवर संविधानावर हल्ला करण्याचा आरोप करत, संभलमध्ये झालेल्या पाच जणांच्या हत्येचा मुद्दाही उचलला. “भाजपचे लोक एका धर्माला दुसऱ्या धर्माशी भांडायला लावतात. हे कुठे संविधानात लिहिलं आहे?” राहुल गांधींनी सांगितले की, “आमची आणि इंडिया आघाडीची विचारधारा संविधान स्थापन करण्याची आहे.”

Leave a Reply