आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष नेते दौरे करतायत. महविकास आघाडी कश्या प्रकारे हि निवडणुक लढणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी हे एकमेव आघाडी सरकार आहे ज्यामध्ये तिन्ही पक्ष एकत्र आहेत आणि ही महाविकास आघाडी सरकार निवडणूक एकत्र लढणार असल्याचे सांगितले. ही निवडणूक आम्ही सुरळीत पार पाडणार आहोत. आमच्या मध्ये खेळीमेळीचे आणि संप्रेषणाचे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार सर्व नेत्यांशी विचार विमर्श करून निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी म्हटले.
महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करता यावी, त्यांची भेट घेता यावी म्हणून उध्दव ठाकरे यांनी एक दौरा केला असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. या बैठकीत सर्व राजकीय चर्चा झाल्या त्याच बरोबर बाकी गोष्टीवर सुद्धा संवाद साधला. तिन्ही पक्षांचा मेळावा घेण्यात येणार आहे. हा मेळावा मुंबई मध्ये १६ ऑगस्टला होणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये बैठक झाली ज्यामध्ये जागा वाटपावरून सर्वांसोबत संवाद साधला गेला. या निवणुकीत सर्व समान असतील. सर्व निर्णय सर्वांना विचारात घेऊन आणि त्यांच्याशी बोलून घेतले जातील. जागा वाटप करण्याचे असेल तर ज्याचा पक्ष जास्त जागा मिळवेन त्याला ती जागा असे आम्ही ठरवले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.