उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यासंदर्भात बारामती येथून मोठी बातमी समोर आली आहे. निकाल जाहीर होण्याआधीच बारामतीमध्ये भावी मुख्यमंत्री असा अजित पवार यांचा उल्लेख असलेला बॅनर लावला आहे. या फलकामुळे सर्वत्र धाकधूकीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा फलक बारामतीतील भिगवण रस्त्यावर लावण्यात आला आहे. तसेच हा फलक नदीम शेख मित्रमंडळीच्या वतीने लावण्यात आला आहे. भावी मुख्यमंत्री अजित पवार असा उल्लेख त्यांनी या फलकावर केला आहे. एवढेच नाही तर, ‘मी अजित आशाताई अनंतराव पवार ईश्वर साक्ष घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून…’ अस देखील त्या बॅनरवर लिहले आहे.
या बॅनरमुळे बारामतीमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे. खरच अजित पवार भावी मुख्यमंत्री होणारं का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.