
वाळवा तालुका पंचायत समितीच्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून ८८ टीव्ही संच जयंत पाटलांच्या हस्ते वितरित!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरुवातीपासून सक्रिय आहेत. विरोधकांना आपल्या वक्तव्यामधून नामोहरम करणारे जयंत पाटील हे आपल्या जिल्ह्यामध्ये विकास कामाच्या बाबतीत आग्रही असल्याचे वारंवार दिसून आले आहे. जनतेने त्यांच्या याच कामाची दखल घेत त्यांना वारंवार त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.
शिक्षणाच्या बाबतीत दर्जा सुधारला पाहिजे म्हणून जयंत पाटील यांच्या हस्ते ८८ टीव्ही संच शाळांना देण्यात आले आहेत या बाबतीत त्यांनी ट्विट करत माहिती दिली. ते म्हणतात की ‘माझी शाळा आदर्श शाळा’ या संकल्पनेतून सांगली जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक, भौतिक दर्जा सुधारला जात आहे. याच धर्तीवर वाळवा तालुका पंचायत समितीच्या १५व्या वित्त आयोग निधीद्वारे ८८टीव्ही संच देण्यात आले. वाळवा तालुक्यातील १००%शाळा डिजिटल व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत”.
आधुनिक शिक्षण मिळावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने ८८ टीव्ही संच दिले असल्याचे दिसून येत आहे.