राष्ट्रवादी काँग्रेसने दिला ‘भारत बंद’ला पाठींबा!

0

संयुक्त किसान मोर्चा या शेतकरी संघटनेच्या वतीने २६ मार्चला भारत बंदची हाक दिली असून या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. केंद्र सरकारच्या तीन काळ्या कृषी कायद्याविरोधात गेल्या १०० हुन अधिक दिवसांपासून देशातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. यामध्ये आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे, सरकारची असंवेदनशील वागणूक पाहता कुठलाच पर्याय न उरल्यामुळे शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे आणि या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे.

संयुक्त किसान मोर्चा या संघटनेच्या बॅनर खाली देशातील ५०० पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी बांधव शांततामय मार्गाने केंद्र सरकारने केलेले काळे कृषि कायदे रद्द करण्याची मागणी करताय.

केंद्रातील भाजपच्या सरकारने सार्वजनिक संपत्तीची विक्री करून जनहितास बाधा पोहचवणारे निर्णय घेतले आहेत. इंधन व गॅस सिलेंडरच्याझालेल्या दरवाढीने महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य लोकांना जीवन जगणे अवघड बनले आहे. कामगार कायद्यात बदल केल्यामुळे कामगार वर्ग देशोधडीला लागला आहे. या सर्व बाबींच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने दि. २६ मार्च २०२१ रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याना या बंद मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत, मोठ्या संख्येने नागरिकांना सहभागी करून घेण्याची विनंती केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.