“आरआरआर” चे हक्क विकले तब्बल ३५२ कोटीला

0

बाहुबली चित्रपटाच्या यशामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेले दिग्दर्शक एस एस राजमौली यांच्या आर या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

बाहुबली चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर होता अक्षरशः लोकांना त्याच्या पुढील भागाची तितकीच उस्तुक्ता लागली होती.

नुकतेच “आरआरआर” चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. मात्र या चित्रपटाने आत्ताच रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. हक्कांच्या बदल्यात मिळालेली रक्कम पाहून धक्का बसल्या शिवाय राहत राहणार नाही.
‘आरआरआर’च्या हिंदी सिनेमाला थिएटरमध्ये रिलीज करण्याचे हक्‍क तब्बल 140 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. तसेच सर्व भाषांमधील ‘आरआरआर’च्या सॅटेलाइट आणि डिजिटल ब्रॉडकास्टिंगच्या अधिकारांची किंमत मिळून निर्मात्यांना तब्बल 325 कोटी रुपये मिळाले आहेत.

ब्रॉडकास्ट हक्‍कांबाबतचा सर्वात मोठा हा सौदा ठरला आहे. हक्‍कांबाबतच्या या व्यवहारांवर निर्मात्यांकडून अद्याप अंतिम शिक्‍कामोर्तब केले गेलेले नाही. मात्र या चित्रपटाच्या बाबतीत सगळीकडेच उस्टुक्ता लागली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.