Posted in

“छगन भुजबळांशी झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीसांचा खुलासा; सर्व मुद्दे केले स्पष्ट”

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावर तीव्र विरोध व्यक्त झाला. विशेषतः अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छगन भुजबळ यांनी घेतलेली भेट राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना जन्म देत आहे. या भेटीनंतर, छगन भुजबळ परदेशात गेले होते, पण आता ते मायदेशात परतले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नाराज छगन भुजबळ हे सातारा येथील एका कार्यक्रमात एकत्र दिसले, आणि दोघांनी एकाच वाहनातून प्रवास केला, अशी माहिती समोर आली आहे. पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ते त्यांच्या मूळ गावी आलो आहे. याठिकाणी स्मारक उभारण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय असून, त्याच्या विस्तारित स्वरूपाच्या प्रकल्पाची सादरीकरणे पाहिली आहेत. लवकरच या स्मारकाचे काम सुरू होईल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळ यांच्याशी काय चर्चा झाली, असा प्रश्न विचारला असता, फडणवीस यांनी स्पष्ट केले की, ही चर्चा महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य पुढे कसे नेले जाऊ शकते, यावर आधारित होती. या दिग्गज नेत्यांच्या कार्यामुळे देशाला दिशा दिली आहे. सर्वांपर्यंत ते विचार कसे पोहोचवता येतील, समतायुक्त समाज तसेच भारतीय संविधानाचा आदर करणारा समाज निर्माण करण्यावर कसा भर देता येईल यावर चर्चा करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. तसेच फडणवीस यांनी याव्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाल्याचे नाकारले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाबाबत काही वचन दिले का, असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला. यावर बोलताना भुजबळ यांनी स्पष्ट केले की, मंत्रिपदाबाबत फडणवीस मला काहीच बोलले नाहीत. फडणवीस फक्त ७ ते १० दिवस थांबा आणि त्यानंतर चर्चा करू असे म्हणाले. “मला मंत्री बनवण्याबाबत किंवा अन्य कोणत्याही जबाबदारीबाबत काहीही बोलले गेले नाही, माझ्याकडून देखील असे काही सुचवले गेले नाही.”

Leave a Reply