Posted in

राहुल-प्रियंका गांधींवर भाजप आमदाराची टीका; बाळासाहेब थोरातांनी दिले जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

बीड आणि परभणी येथील प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि इतर विरोधक महायुती सरकारला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः, वाल्मीक कराडच्या अटकेवरून महायुती सरकारवर तीव्र हल्ले होत आहेत. याच दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर भाजपाच्या आमदारांनी टीका केली आहे. या टीकेमुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दांत भाजपावर टीका केली आणि विरोधकांच्या आरोपांचा निषेध केला.

भाजपा आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी केरळला मिनी पाकिस्तान संबोधत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या निवडणुकीसंदर्भात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, केरळमधील अतिरेकी लोकच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना मतदान करतात आणि अतिरेकी लोकांमुळेच हे लोक खासदार झाले आहेत. या विधानावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या असून, नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी नितेश राणे यांच्यावर तिखट पलटवार केला आहे.

भाजपा मंत्री नितेश राणे यांच्या केरळला मिनी पाकिस्तान म्हणण्यास आणि राहुल-प्रियंका गांधी यांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी असे हिणवणे केवळ भाजपचे मंत्रीच असे अपशब्द वापरू शकतात. जेव्हा भाजप काही सकारात्मक करू शकत नाही, तेव्हा हिंदू-मुस्लिम आणि भारत-पाकिस्तान हा अजेंडा पुढे आणतात. मंत्री पदावर असलेली व्यक्तीने सार्वजनिक बोलताना आणि वागताना भान राखायला हवे. पण नितेश राणे यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. असे बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले, “जितकी जास्त बाष्कळ बडबड तितकी जास्त प्रगती हे भाजपचं समीकरण आहे, त्यामुळे मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा तारे तोडले आहेत.” तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्याला समजावताना योग्य वर्तन राखण्याचा सल्ला द्यावा. “मंत्र्यांनी पद स्वीकारताना शपथ घेतली आहे, त्यामुळे त्यांना समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तन टाळायला हवे” असे ते म्हणाले.

Leave a Reply