Posted in

“वाल्मिक कराडच्या अटकेआधी जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर गंभीर आरोप”

बीड आणि परभणी येथील प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि इतर विरोधक महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः वाल्मीक कराडच्या अटकेवरून महायुती सरकारवर हल्लाबोल सुरू झाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने या अटकेवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तसेच सरकारवर टीका करत आहेत. एक्सवरील पोस्टद्वारे जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला प्रश्न केले आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

मस्साजोग येथील पवनचक्कीच्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी वाल्मीक कराडवर १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडे शस्त्र परवाना असतानाच गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलिस बॉडीगार्डही होते, ज्यामुळे पोलिसांची भूमिका शंकेखोर ठरली आहे. यादी पत्र दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मीक कराड, सुदर्शन घुले आणि इतर फरार आरोपींवर सीआयडीने नऊ पथकं आणि १५० हून अधिक अधिकारी नियुक्त केले आहेत. परंतु २२ दिवस उलटूनही या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. कराडच्या पोलिसांच्या ताब्यात येण्याच्या नंतर पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, पोलिसांनी दावा केला की, खबरींकडून त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा कुठेतरी लांब जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीला आडवी गाडी टाकून अडवले आणि त्याला गाडीत बसवले. मात्र, आव्हाड यांनी सांगितले की, महाराष्ट्राने अशा कोणत्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये.

त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता. तो शानमध्ये, कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल. पण, त्याला रंग मात्र शौर्याचा दिला जाईल. मला या सरकारला एवढेच सांगायचे आहे, जो बूंद से गयी हो हौद से नही आती. आव्हाड यांनी सरकारला प्रश्न केला की, अजूनही त्याला 302 चा आरोपी का करत नाही? त्याला मोक्का कधी लावणार याचे उत्तर मिळालेले नाही. न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याचे उत्तर मिळालेले नाही. असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

Leave a Reply