Posted in

“प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ भाजपा नेत्या आल्या पुढे; “प्राजक्ता या लढाईत एकटी नाही, असा दिला विश्वास”

अभिनेत्री प्राजक्ता माळीने रविवारी सायंकाळी भाजप आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिला आश्वस्त करत सांगितलं की, प्राजक्ता माळीच्या सन्मानास कोणतीही बाधा होईल असे कृत्य सहन केले जाणार नाही आणि त्यावर योग्य कारवाई केली जाईल.

अभिनेत्रीच्या समर्थनासाठी आता भाजपाच्या नेत्या पुढे आल्या आहेत. भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी “प्राजक्ता या लढाईत एकटी नाही, हे मी विश्वासाने सांगते, असे त्यांनी म्हटले. “आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला पाहिजे” असेही त्यांनी सांगितले. याबाबत चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले.

चित्रा वाघ यांनी आपल्या पोस्टमध्ये “स्त्री चा सन्मान याला भाजपाचे सर्वोच्च प्राधान्य कायमच राहीले आहे …त्यामुळे कुणालाही कुणाचेही नाव घेऊन अशा पद्धतीने चिखलफेक करण्याचा अधिकार नाही. आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे. या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते…” असं म्हटलं आहे.

गौतमी पाटील यांनी प्राजक्ता माळीच्या भूमिकेचे समर्थन करत म्हणाल्या, “प्राजक्ता ताई, आम्ही सर्व कलाकार तुमच्यासोबत आहोत. ट्रोलिंग कडे लक्ष देऊ नकोस. मी ऐकलं की पत्रकार परिषदेत तू जे काही बोललीस, ते सर्व योग्य होतं. कृपया, कोणाचं नाव कोणाशी जोडू नका. मी स्वत: एक कलाकार आहे. कलाकाराला कलाकाराच्या स्थानावर राहू द्या. त्याच्या दुःखाची खरी जाणीव त्यालाच असते. म्हणून, त्याला पाठिंबा द्या.”

Leave a Reply