Posted in

शिंदेंनी प्रचार सभेत दिला होता मंत्रिपदाचा शब्द, पण त्याच नेत्याला मिळालं नाही स्थान नेमकं काय घडलं?

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. परंतु, मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता आणि त्यानंतर राज्यभरातील सर्वांचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले होते.अखेर रविवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारात 33 कॅबिनेट आणि 6 राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. ज्यामुळे अनुभवी नेत्यांना वगळण्यात आले आहे.

राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या 19, शिवसेना शिंदे गटाच्या 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. नागपूरमध्ये काल झालेल्या या शपथविधीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली, मात्र मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या काही दिग्गज आमदारांचा पत्ता कट करण्यात आला. यामध्ये तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आणि दीपक केसरकर यांसारख्या बड्या नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, ज्यामुळे काही नेत्यांमध्ये नाराजी दिसत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना त्यांच्या मतदारसंघात प्रचार सभा घेताना मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते. शिंदे यांनी सभेत सांगितले होते, “तानाजीला आमदार करा, नामदार करायची जबाबदारी माझी.” मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांना मंत्रिपद दिले नाही, आणि यामुळे त्यांच्यात नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply