Posted in

“सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका; ‘खळं लुटणारा गावाकडे आला’…”

रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यांनी शरद पवार यांचं नाव न घेता “खळं लुटणारा गावाकडे आला” असं वक्तव्य केले. तसेच राहुल गांधीबद्दल “इंडियातील मोठा चोर” असं वक्तव्य केले. या विधानाने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. याआधी देखील शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली होती, ज्यावर अजित पवारांनी त्यांना समज दिला होता.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावात राजकीय तापमान वाढलं आहे. गावातील नागरिकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेतला. मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केल्याने ते होऊ शकले नाही. त्यानंतर शरद पवार यांनी या गावात सभा घेतली, तर राहुल गांधी या गावातून ईव्हीएमविरोधात रॅली काढणार आहेत. भाजप आणि महायुतीकडूनही सभा आयोजित करण्यात आली. या सभेत सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

सदाभाऊ खोत यांनी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचा बॅलेट पेपरवर मतदान करतानाचा फोटो दाखवला आणि ईव्हीएम मशीनसंदर्भात शंका उपस्थित केली. ते म्हणाले की, शरद पवार सत्ता गमावल्यानंतर शांत बसत नाहीत आणि एक नव्हे तर अनेक डाव टाकतात. गेली 40 वर्षे पवारांनी डाव टाकले, पण त्यांचे डाव आता फसले आहेत. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीका करत विचारले की, “1 लाख मतांनी तुमची मुलगी निवडून आली, तुमचा नातू देखील निवडून आला, तेव्हा ईव्हीएम मशीन ठीक होती का?”

सदाभाऊ खोत यांनी राहुल गांधीवर टीका करत त्यांची मिमिक्री केली. त्यांनी म्हटलं की, “राहुल गांधी यांच एक स्वप्न आहे की, माझ लग्न कधी होईल आणि मी त्यानंतर पंतप्रधान होणार आहे.” तसेच “राहुल गांधी गावात आल्यावर मारकडवाडीत दोन डबे मांडा, बॅलेट पेपरवर निवडून येऊ द्या, त्यानंतर त्याला पंतप्रधान करा.” सदाभाऊ खोत यांनी अश्या विधानाद्वारे राहुल गांधीची खिल्ली उडवली आणि त्यांच्यावर टिपण्णी केली.