कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली असून, याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने याच दिवशी मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित केला. मात्र, कर्नाटक पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, ज्यामुळे महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर तणाव निर्माण झाला. या तणावावर प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, “भाजप सरकार असताना तुम्ही का गप्प होतात? आता कॉंग्रेस सरकार आहे म्हणून टीका केली जाते. ‘मोदी है तो मुमकीन है’ असे म्हणणारे मोदी, मग सीमावाद का सोडवत नाहीत?” असे प्रश्नचिन्ह मोदी सरकारवर उपस्थित केले.
भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “राहुल नार्वेकर यांचे विधानसभेच्या अध्यक्षपदी येणे आम्हाला माहिती नाही, परंतु हे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार आहे.” तसेच “देशपातळीवर महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या कामकाजाचे कौतुक केले जाते आणि आजची निवड देखील परंपरेनुसार केली आहे.” हे वक्तव्य त्यांनी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना केले.
नाना पटोले यांनी सांगितले की, कामकाज समितीची मिटींग संपन्न झाली असून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही भूमिका मांडली आहे. त्यानुसार, विधानसभेच्या उपाध्यक्षपदावर विरोधी पक्षाचा प्रतिनिधी असावा, अशी भूमिका आहे. जेव्हा महाराष्ट्रात विरोधी पक्षांचे फक्त 6-7 आमदार होते, तेव्हाही विरोधी पक्षनेता नियुक्त करण्यात आला होता. त्यामुळे नागपूरच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेता निश्चित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“बहुमताची मस्ती सरकारला चढली आहे, ज्यामुळे अभिनंदनावर चर्चा होणं आवश्यक होतं, पण त्याऐवजी पाशवी बहुमताचं प्रदर्शन करण्यात आलं.” त्यांनी उल्लेख केला की, मारकडवाडी आणि महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये ग्रामसभेचे ठराव घेणं सुरू आहे, परंतु लोकांना या प्रक्रियेवर संशय आहे. अस पटोले यांनी सांगितले. त्याच वेळी, पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या मैत्रीवर बोलताना सांगितले की, “प्रेमाचा विषय नाही, आम्ही दोघंही एकाच भागातून निवडलेले सदस्य आहोत, आणि माझी आणि फडणवीसांची मैत्री जगजाहीर आहे.”