भिवंडी खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, ते शरद पवार यांच्यासोबतच आहेत आणि फडणवीस यांच्याशी झालेल्या भेटीचा खुलासा देखील केला.
धनंजय मुंडे आणि बाळ्यामामा म्हात्रे यांनी मुंबईतील सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. यावर बाळ्यामामा म्हात्रे यांनी स्पष्ट केले की, त्यांनी फडणवीस यांना वैयक्तिक कामासाठी भेटले होते आणि राजकीय विषय नाहीत. “राजकीय चर्चा असती तर दुपारी 2 वाजता गाडी घेऊन कोण भेटायला जाईल?” अस बाळ्यामामा म्हात्रे यांनी सांगितले.
बाळ्यामामा म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर शरद पवार यांची साथ सोडण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. यावर बाळ्यामामा म्हात्रे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना स्पष्ट केले की, “मी कोणाशीही भेटलो नाही, मीडियाने वेगवेगळे तर्क लावले आहेत. एकमेकांना भेटणे म्हणजे राजकारण नसते. मी खासदार आहे, आमदार नाही. शरद पवार यांना सोडण्याचा प्रश्नच नाही. मी त्यांच्याच पक्षात आहे,” असही ते म्हणाले.
बाळ्यामामा म्हात्रे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव केला होता. भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रे आणि भाजपमधील राजकीय संघर्ष सर्वांना पाहिला आहे. मात्र शपथविधी अगदी काही तासांवर असताना बाळ्यामामा यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावर बाळ्यामामा म्हात्रे यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले. यामध्ये राजकीय कोणताही उद्देश नाही.