महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल लवकरच जाहीर होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना आता उधाण आले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सरकार सत्तेची ही लढाई जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी ते छोट्या पक्षांना तसेच अपक्षांनादेखील संपर्क साधत आहेत.
नुकतेच महायुती आणि महाविकास आघाडीने तिसरी आघाडी निर्माण करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला. बच्चू कडू हे आधी महायुती सरकारमध्ये सहभागी होते. मात्र निवडणुकीदरम्यान त्यांनी परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून तिसरी आघाडी निर्माण केली आणि महायुतीपासून दूर झाले.
बच्चू कडू यांनी दावा केला आहे की, त्यांनी निर्माण केलेल्या आघाडीला महाराष्ट्रात १५ जागा मिळणार. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. आता बच्चू कडू कोणाच्या बाजूने जाणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
आम्हाला महायुती आणि महाविकास आघाडीकडून संपर्क केला जात आहे. मात्र आम्ही अजून काहीच निश्चित केले नाही. आमच्या पक्षाचे ४ ते ५ उमेदवार निवडून येतील. आम्ही आमचं सरकार स्थापन करणार आहोत. कोणाला पाठिंबा देण्याची वेळ येऊ देणार नाही, अस व्यक्तव्य बच्चू कडू यांनी केल.