महाराष्ट्रात सध्या महायुतीला पुन्हा एकदा सत्ता मिळाल्याने सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे आणि सर्वांचे लक्ष राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे लागले आहे. महायुतीकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री देणारं असल्याच्या चर्चा होत आहेत.
तसेच, नव्या सरकारमध्ये भाजपचे १० आमदार, शिवसेना शिंदे गटाचे ६ आमदार, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ४ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर, नव्या सरकारचा शपथविधी लवकरच पार पडण्याची तारीख समोर आली आहे.
या संदर्भात भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार यावर रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारण्यात आले. तसेच यावेळी कोण मुख्यमंत्री होणार? याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आले.
नव्या सरकारचा शपथविधी ३० तारखेला पार पडणार आहे. भाजपबरोबर बाकी इतर पक्षांचे कार्यकर्ते नेते यांना त्यांचा मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. त्यामुळे सर्वजण याची मागणी व्यक्त करत आहेत. कोण होणार मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला हा सर्वजण मिळून ठरवला जाणार आहे, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे तसेच मुंबई आणि दिल्लीत बैठका सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, नवीन सरकार कधी शपथ घेणार आणि मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.