Posted in

“एकनाथ शिंदे होणार ‘या’ खात्याचे मंत्री? शिवसैनिकांची प्रतिक्रिया काय?”

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासूनच राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडींना सध्या वेग आला आहे. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या चर्चांना उधाण आले आहे. निकाल जाहीर होऊन आता ७ दिवस झाले आहेत. महायुतीला या निवडणुकीत २३० जागांवर यश मिळालं आहे. मात्र तरीही मुख्यमंत्री कोण होणार? हे अजून ठरले नाही.

नुकतच पार पडलेल्या दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह १२ मंत्रिपदांची मागणी केली आहे. त्यांनी गृहखाते, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम यासह विविध महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली आहे. मात्र महायुतीच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना गृहमंत्रिपद देण्यास नकार दिला आहे.

एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद देण्यास नकार दिला मात्र भाजपने शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदासह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. त्यावर शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी केली असल्याचं बोललं जातं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याची शक्यता आहे. शिवसेना नेत्यांनी शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची मागणी केली आहे. तसेच, पक्ष वाढवण्यासाठी शिंदे हे राज्यातच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.