विधानसभा निवडणुकीच्या निकलानंतर महायुतीला पुन्हा एकदा सत्ता मिळाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीमध्ये याबाबत संघर्ष सुरू आहे. अशातच शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद द्यावं अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.
तसेच सर्वसामान्य जनतेची देखील इच्छा आहे की, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे. जी कामे गेल्या १५ वर्षात झाली नाहीत ती कामे मागच्या अडीच वर्षात झाली आहेत. राज्यात चांगल नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबच करतील असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केले आहे.
तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देण्यात यावं आणि एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला आल पाहिजे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे, आम्ही काय करायचं हे रामदास आठवलेंनी सांगू नये… त्यांचा यात काहीच समावेश नाही तरीही ते बोलतात असे शिरसाट म्हणाले.
त्यामुळे आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? कोणाला सत्ता मिळणार? याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.