Posted in

जयंत पाटील यांनी दिली अजित पवारांच्या मागणीवर प्रतिक्रिया म्हणाले…

आगामी विधानसभा निवडणुका आता जवळ आल्या आहेत. त्यामुळे सध्या मुख्यमंत्री कोण होणार यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत वाद सुरु झाले आहेत. अशातच राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची इच्छा असल्याचे सांगितले. भाजपचे नेते अमित शहा यांच्या समोर हा प्रस्ताव मांडण्यात आला.

यासंदर्भात माहिती ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकाने दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात त्यांचे मत व्यक्त केले. त्यांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना अजित पवारांच्या मागणी बद्दल काही प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी त्यांचे मत सांगितले.

मला तरी अस वाटत की अजित पवार अशी मागणी निवडणूकी आधी करणार नाहीत. अजून निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे अशी मागणी ते करतील असे मला नाही वाटत. ही एक अफवा असेल. कारण भाजप मधील अनेक नेत्यांना मुख्यमंत्री बनायचं आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

“बिहारच्या प्रयोगाबद्दल मी बोलणं सध्या तरी बरोबा नाही. त्यांच्या आघाडीबद्दल काहीही बोलणं मला तरी योग्य नाही वाटत. यावर आपण घटना घडल्यानंतर बोलू शकतो. यासंदर्भात आम्ही आता काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही”, असेही जयंत पाटील म्हणाले.