Posted in

“तुमच्या तोंडून मर्दांनगीची भाषा शोभत नाही”… संजय राऊतांची अजित पवारांवर जोरदार टिका

सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळला. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई मध्ये गेटवे परिसरात या नेत्यांनी जोडे मारा आंदोलन चालू केले. या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घनघोर टिका केली. “हिंमत असेल तर समोर या. रडीचा डाव कसला खेळताय”, अशी टीका केली.

यासंदर्भात संजय राऊत यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी या आंदोलनाबाबत सांगीतले. अजित पवारांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेवर त्यांनी भाष्य केले. “जे आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वत:च कर्तृत्व नसताना पळवून नेतात, त्यांच्या तोंडात मर्दांनगीची भाषा शोभत नाही”, असे बोलत त्यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर जोरदार टिका केली.

आम्ही रडीचा डाव कधी खेळतच नाही. ज्यांना स्वतःच कर्तृत्व नसताना आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह पळवून नेले त्यांनी आम्हाला शिकवू नये. आणि आमच्यासोबत ही भाषा वापरू नये. त्यांनी स्वतःचा पक्ष निर्माण करावा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूका लढाव्यात. तुमच्या तोंडून ही मर्दांनगीची भाषा शोभत नाही, असे संजय राऊत बोलले.