विधानसभा निवडणुकीची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. राजकीय पक्षांचे नेते दौरे करत आहेत. या निवडणुकीसाठीच्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. कोणत्या पक्षाला किती जागा भेटणार यासंबंधी अजुन काही निर्णय घेतला नाही. अशातच राष्ट्रवादी किती जागांवर लढणार आहे याचा आकडा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितला.
सध्या आपल्याकडे ५६ जागा आहेत, आपण त्या लढणार आहोतच पण आता एकूण ६० जागांवर देखील आपण निवडणूक लढायची, अस विधान अजित पवार यांनी केले. काल संध्याकाळी मुंबई मध्ये त्यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी जागा वाटपाबाबत स्पष्ट सांगितले.
निवडणूका जवळ आल्या की अनेक नेते पक्षांतर करतात. त्यामुळे अजित पवारांनी त्यांच्या पक्षात काही नेते प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आमदार सुलभा खोडके, मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी तसेच नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर हे सर्व आपल्या बाजूनेच आहेत. अजून बरेच नेते आहेत जे आपल्यासोबतच आहेत असा दावा त्यांनी केला.
आधी फक्त चर्चा सुरू होती मात्र आता अजित पवारांच्या या दाव्यामुळे स्पष्ट झाले आहे की हे नेते पक्ष प्रवेश करतील. आणि त्यांच्या बाजूने या निवडणूकीत उभे राहतील. आता फक्त या नेत्यांचं पक्षांतर होत की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.