Posted in

“आम्ही २८८ उमेदवार पाडू”; मनोज जरांगेनी सरकारला दिला इशारा

विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. निवडणूकीची जोरदार तयारी सुरू आहे. हाती आलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील देखील ही निवडणूक लढणार असल्याचं बोललं जातंय. आणि या निवणुकीसाठी ते तयारीला लागले आहेत. त्यांच्याकडे या निवडणुकीसाठी ८०० पेक्षाही जास्त अर्ज आले आहेत.

मनोज जरांगे यांनी आरक्षण मिळावे यासाठी खूप आंदोलने केली. आणि आता त्यांनी आरक्षण नाही मिळाले तर २८८ उमेदवार पाडू असा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. ज्या ठिकाणी त्यांनी भाषण केले तिथं तिथं त्यांनी २८८ उमेदवार पाडणार असल्याचा उल्लेख केला. मात्र आता त्यांनी त्यांचा निर्णय बदलून या आकड्यामध्ये बदल केला आहे. फक्त ११३ उमेदवार पाडणार असल्याच त्यांनी सांगितले. त्यांच्या या बदलत्या निर्णयामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे.

आम्ही अजुन यावर निर्णय घेतला नाही. मात्र आम्ही यावर निर्णय घेण्यासाठी राजकीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत निर्णय घेणार आणि ठरवणार आहे की निवडणूक लढायची का उमेदवार पाडायचा. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत तर या निवडणुकीत तुमचे ११३ उमेदवार पडणार, असं मनोज जरांगेनी सांगितलं.

मराठा आणि ओबीसी समाजाबद्दल बोलताना त्यांनी सांगीतले की, आमच्यामध्ये कोणतेही वाद नाहीत. आणि आम्हाला रोज भेटल्याशिवाय जमत नाही. मात्र राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भुजबळ आमच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही एक आहोत, अस मनोज जरांगे म्हणाले.