Posted in

“महाराजांना देखील या सरकारने सोडलं नाही”… आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं सगळीकडे खळबळ जनक वातावरण तयार झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४ डिसेंबर २०२३ ला पुतळ्याचे अनावरण केले होते. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी नाराज झाले आहेत. तसेच त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

याच संदर्भात पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीचे नेते किल्ल्यावर गेले. आदित्य ठाकरेंनी याच्या संदर्भात सरकारला काही प्रश्न विचारले. एवढ्या लहान फक्त २४ वर्षाच्या मुलाला कंत्राट दिलं कोणी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

जगात कितीतरी पुतळे आहेत, जे समुद्र किनारी आहेत. त्यामध्येच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा 138 वर्षाचा जुना पुतळा आहे. मग फक्त सहा महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा निकृष्ट झालाच कसा? आणि तो आपटे नावाचा मुलगा कुठे गेला. तो पळून जाऊच कसा शकतो. अस आदित्य ठाकरे म्हणाले.

काय चालय या महाराष्ट्रात? हे सरकार भ्रष्टाचार करत आहे. हे सरकार आल्यापासून असल्या घटना घडल्या. बदलापूर मध्ये झालेले अत्याचाविरोधात दहा दिवसांनंतर तक्रार नोंदवली जाते. आता काय तर महाराजांचा पुतळा देखील कोसळला. यांनी तर महाराजांना देखील सोडलं नाही. अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.