Posted in

“पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात त्याची माती होते”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

सिंधुदुर्गातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा पुतळा ८ महिन्यांपूर्वी उभारला होता. या पुतळ्याचे ४ डिसेंबर २०२३ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घघाटन करण्यात आले होते. या घटनेमुळे शिवप्रेमी खूप निराश झाले आहेत. याच संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.

संजय राऊत हे त्यांच्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसल्याच्या घटनेवर आधारित काही गोष्टी सांगितल्या. या घटनेमुळे महायुती सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले. “पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात त्याची माती होते” असे विधान करत त्यांनी मोदींवर टीका केली.

पंतप्रधान मोदी जिथे हात लावतात तिथं त्याची माती होते. याचे उदाहरण द्यायचे झाले तर अयोध्येचे राम मंदिर देखील गळत आहे. तिथे पाणी गळती सूरू झाली. पुलांचे उद्घाटन केले तर ते पण तुटले फुटले. त्यांनी जे काही केलय ते सर्व उध्दवस्त होतय. याला तुम्ही श्रद्धा म्हणा नाहीतर अंधश्रद्धा मात्र हे खर आहे. आणि भारतात हे घडत आहे, असेही त्यांनी म्हटले.

हा पुतळा कोसळल्याने सगळीकडे वातावरण चांगलच बिघडलं आहे. फक्त ८ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी नाराज झाले आहेत. बऱ्याच राजकीय नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिल्याच पाहायला मिळत.