Posted in

कोण होणार पुढील मुख्यमंत्री? अजित पवारांनी केले स्पष्ट

विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात खळबळ सुरू आहे. निवडणूकीची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच काही राजकीय नेते त्यांचे दौरे, सभा, मेळावे आयोजित करत आहेत. या निवडणूकीत कोण विजयी होणार? आणि नवा मुख्यमंत्री कोण असणार? तसेच यासाठी कोणते उमेदवार असतील? याची चर्चा होताना दिसत आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत काही प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी या प्रश्नांवर स्पष्टपणे उत्तरे दिली. यावेळी मुख्यमंत्री कोण होईल? तुमची चर्चा झालीय असेल ना? असे प्रश्न विचारले त्यावर त्यांनी त्यांची प्रतिक्रीया दिली. जेव्हा सरकार निवडून येईल तेव्हा कोण मुख्यमंत्री असेल हे त्यावेळी ठरवले जाईल असे त्यांनी सांगितले.

आम्ही आज बैठका घेतल्या. ज्यामध्ये आम्ही विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यामध्ये कामगारांमधील बेचैनी बघता आम्ही त्यावर मार्ग शोधला. तसेच वेतन देण्याबाबत देखील निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पूरग्रस्त भागातील लोकांना चेक देण्यात आला. असेही त्यांनी सांगितले.

अजित पवारांनी पुण्यातील कोयता प्रकरणावर देखील भाष्य केले. ही घटना खूप दुर्दैवी आहे. असे कृत्य करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सर्वांनी पोलिसांची प्रतिमा जपायलाच पाहिजे तसेच पोलिसांचा दरारा, धाक पाहिजे. असही अजित पवार म्हणाले.